ब्रेकिंग न्यूज

मुख्य बातम्या

पारनेर: शिवसेना युवा तालुका प्रमुखांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तिघांना अटक

पारनेर(APLive24): तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये शनिवार दि.१० रोजी दुपारी ३.३० वाजता ठेकेदारी मिळण्यावरून दोन गटात बाचाबाची झाली व त्यांचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले.पोलिस प्रशासनाने तरुणांना पांगविण्यासाठी जोरदार लाठीचार केला.    ...


अहमदनगर:जिल्हा शिक्षक संघाची कार्यकारणी बरखास्त करून नव्याने कार्यकारणी करणार

 गुरुमाऊली मंडळाच्या आमसभेत निर्णय

अहमदनगर(APLive24):जिल्हा शिक्षक संघाची कार्यकारणी बरखास्त करून नव्याने कार्यकारणी करणार असल्याचा निर्णय गुरूमाऊली मंडळाच्या आमसभेत घेण्यात आला.

 आज दिनांक 11 ऑगस्ट  रोजी गुरूमाऊली मंडळाची आम सभा मंडळाचे अध्यक्ष बापुसाहेब तांबे यांचे अध्यक्षतेखाली...


संगमनेरमध्ये १० कोटींच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण

संगमनेर (APLive24): दहा कोटींच्या खंडणीसाठी संगमनेरातून शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाचे अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कापड व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणीची मागणी केली. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत अपहरणकर्त्यांचा माग काढल्याने खंडणीखोरांनी...


जामखेड:व्याजाचे पैसे न दिल्याने केले अपहरण

जामखेड(APLive24): व्याजाचे पैसे न दिल्याने सावकाराने अपहरण करून एकास मारहाण केली. या प्रकरणी तीन जणांविरोधात सावकारकीसह अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रशांत मारुती शिंदे (रा. जवळा, ता. जामखेड) यास आरोपी सावकार आलेश बापूराव...


अहमदनगर:विधानसभेनंतर जिल्ह्यात सहकारी संस्थांची रणधुमाळी

अहमदनगर(APLive24):येत्या ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभेची निवडणुक होत आहे.त्यानंतर लगेच डिसेंबरपासून जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. पुढचे वर्ष पूर्णपणे या संस्थांच्या निवडणुकीचे राहणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, आठ सहकारी साखर कारखान्यांसह तब्बल 4 हजार 187 सहकारी...


कोपरगाव शहरात दिवसभर वाहतूक कोंडी

कोपरगाव(APLive24): शहरातील नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिकांवर पावसात भिजत रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली. पुणतांबा चौफुली ते टाकळी फाटा दरम्यान आज जड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांची कोंडी झाल्याने रहदारी ठप्प झाली होती.

तब्बल दोन-तीन तास ही वाहतूक ठप्प झाली...


आंबेगाव:शिवसेनेने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढणार

मंचर(APLive24):शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मला उमेदवारी देण्यासाठी शिफारस करावी. त्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे. जर शिवसेनेने मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे अपक्ष सदस्य राजाराम बाणखेले...


अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : शेवगाव शहरातील घटना

शेवगाव(*zcx

शेवगाव : अनैतिक संबंधातून शहरातील तरुणाचा बुधवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली.बापूसाहेब एकनाथ घनवट (वय-३७ रा. म्हसोबानगर शेवगाव, मूळ गाव नजीक बाभूळगाव, ता.शेवगाव) असे मृत...


मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले

राहुरी(APLive24):अहमदनगर जिल्ह्यातील  सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. आमदार शिवाजी कर्डिले यांनी कळ दाबल्यानंतर मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले.२६ टीएमसी क्षमता असलेल्या मुळा तांत्रिकदृष्ट्या भरले आहे....


संगमनेरमध्ये विविध मागण्यांसाठी उपोषण

संगमनेर(APLive24): कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या बेकायदेशीर गाळ्यांची चौकशी व्हावी. औद्योगिक वसाहतीमधील भूखंड हस्तांतरण तसेच शासन निधी अनुदानात झालेली अनियमितता, जलशुध्दीकरण प्रकल्प आणि नदीपात्रात सोडण्यात येत असलेले प्रदूषित पाणी बंद करावे, यासह विविध मागण्यांसाठी संगमनेर शहर आणि...


जाहिरात

shadow

वेध

shadow

श्रीरामपूर : बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई, 7 जणांना अटक

श्रीरामपूर(APLive24): शहरातील गोंधवणी परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शहर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. मुलींना अनैतिक मार्गाला लावत देहविक्री करणाऱ्या महिलेसह बंगल्याच्या मालकाला अटक करण्यात आली...


बेल्ह्यात सेल्फीने घेतला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बळी
बेल्ह्यात सेल्फीने घेतला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बळी

शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना बलात्काराचा 'डेमो'
शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना बलात्काराचा 'डेमो'

विद्यार्थ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, मुलाला घरी पाठविणाऱ्या शिक्षिकेला अटक
विद्यार्थ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, मुलाला घरी पाठविणाऱ्या शिक्षिकेला अटक

नगर अर्बन बँकेवर ‘प्रशासक’;दिलीप गांधींना धक्का
नगर अर्बन बँकेवर ‘प्रशासक’;दिलीप गांधींना धक्का

जाहिरात

shadow