नगर अर्बन बँकेवर ‘प्रशासक’;दिलीप गांधींना धक्का

वेध

ब्रेकिंग न्यूज

shadow

अहमदनगर(APLive24):नगर जिल्ह्यातील 109 वर्षाची परंपरा असलेल्या ‘नगर अर्बन को ऑपरेटीव्ह सिड्यूल बँके’च्या गेल्या काही वर्षापासून कर्ज वाटप, वसूली, नोकरभरती यासह विविध प्रकाराच्या घटना घडल्यानंतर आरबीआयने या बँकेवर प्रशासन नेमला आहे. आरबीआयचे निवृत्त अधिकारी सुभाष चंद्रमिश्रा यांनी गुरुवारी प्रशासक पदाची सूत्रं स्वीकारली आहे. बँकेवर प्रशासन नेमण्याची पहिलीच वेळ आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नगर शहरामध्ये ‘नगर अर्बन को आपरेटीव्ह बँक’ हिची 109 वर्षापूर्वी स्थापना झाली होती. गेल्या दहा ते पंधारा वर्षापासून या बँकेच्या संदर्भात सहकार खात्याकडे तक्रारी मोठ्याप्रमाणावर गेल्या होत्या, वाढत्या तक्रारी पाहता व बँकेचे विस्ताराीकरण करण्याच्या नावाखाली बँकेने शेड्यूल बँकेचा दर्जा घेतला हेाता. त्यामुळे ही बँक शेड्यूल बँक म्हणून कार्यरत राहिली आहे.

नगर अर्बन को ऑपरेटीव्ह बॅकेच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, वसंत लोढा यांच्यासह अनेकांनी बँकेच्या गैरकारभारा बाबत आरबीआयकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मध्यंतरीच्या काळामध्ये पुणे येथे दिलेले बोगस वाहन कर्ज कर्जाचा प्रकारसुध्दा उजेडात आला होता. तसेच इतर कर्जासंदर्भात सुध्दा तक्रारी आल्यानंतर रिझर्वर बँकने त्या प्रकरणाची चौकशी तसेच ऑडीटही केले होते. बँकेला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला असल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले होते. बँकेच्या ठेवीसुध्दा सुरक्षीत आहेत की नाहीत, याबाबत सुध्दा शहानिशा करण्यात आली होती. वास्तविक पाहता पतसंस्थांना कर्ज देता येत नाही, असे असताना देखील बँकेने कर्ज दिले, ही बाब सुध्दा तपासामध्ये निष्पन्न झाली. मागिलवर्षी झालेल्या लेखापरिक्षणामध्ये बँकेला साधारणता 30.53 टक्के एनपीए दिसून आला. मात्र, आरबीआयने केलेल्या तपासामध्ये तोच एनपीए जास्त दिसून आला. तसेच कर्जदाराच्या खात्यातुन संचालकांना नातेवाईकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचाही प्रकार उजेडात आला होता. यासर्व प्रकरणासंदर्भामध्ये आरबीआयने बँकेला नोटीस बजावून खुलासा मागीतला होता. मात्र, बँकेने दिलेला खुलासा अयोग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर igjgbejr नगर अर्बन शेड्यूल बँकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश झाले.

जाहिरात

shadow

संबंधित