विद्यार्थ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, मुलाला घरी पाठविणाऱ्या शिक्षिकेला अटक

वेध

ब्रेकिंग न्यूज

shadow

नाशिक(APLive24) : नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आलीय. शिक्षिकेने शाळेतून दुसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला आधारकार्ड आणायला घरी पाठवलं. तो चिमुकला घरी निघाला असताना बांधकाम सुरू असलेल्या एका खोल खड्ड्यात पडला. त्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. नाकातोंडात पाणी गेल्याने त्या मुलाचा करुण अंत झाला. केवळ आधारकार्ड विसरला म्हणून त्याला घरी पाठविणाऱ्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केलीय.

नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संत कबीर नगर येथे अक्षय साठे ह्या 7 वर्षीय शाळकरी मुलाला शाळेतून शिक्षिकेने कागदपत्र आणण्यासाठी सांगितलं. त्यामुळे शाळा सुरू असतानाही अक्षय हा शाळेतून घरी आधारकार्ड घेण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान अक्षय संत कबीर नगर येथे एका खाजगी बांधकाम सुरू असलेल्या जागेतून जात असताना एका खड्यात पडला.

त्या खड्यात पावसाचे पाणी साठलेले होते. त्यात अक्षयचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी महानगरपालिकेच्या शिक्षिका मंदा बागुल आणि बांधकाम करून घेणाऱ्या संगीत वाघमारे यांच्या विरोधात अक्षय साठेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. तर शिक्षिकेला अटक केलीय. अक्षयच्या पालकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

जाहिरात

shadow

संबंधित