APLive24 Watch:कोपरगाव:शबाना शेख,राजेश परजणे यांच्या मनमानीने गुरुजी आक्रमक!

शिक्षण

ब्रेकिंग न्यूज

shadow

कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील गुरुजी मोर्चा काढणार;प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीचा निर्धार

अहमदनगर/कोपरगाव(APLive24):कोपरगावच्या प्रभारी शिक्षणाधिकारी शबाना शेख व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या मनमानी व हुकुमशाही कार्यपद्धतीमुळे कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक प्रचंड मानसिक तणावात आहेत. त्यामुळे दोन महिन्यात दोन प्राथमिक शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.परजणे यांचा हस्तक्षेप तातडीने थांबवा व शेख यांची चौकशी होऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक अहमदनगर जिल्हा परिषद वा कोपरगाव पंचायत समितीवर मोर्चा काढतील असा इशारा प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीने दिला आहे. या आठवड्यात कारवाई न झाल्यास सोमवारी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विभागातील मनमानी कारभारामुळे प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.दोन शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र या विरोधात कुणीच भूमिका घेत नव्हते.सलग तीन दिवस APLive24 ने या विषयावर आवाज उठवल्याने आता प्राथमिक शिक्षक संघटना जाग्या झाल्या असून काल संध्याकाळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना  निवेदन देण्यात आले.  याच्या प्रति मुख्यमंत्री,शिक्षण मंत्री,ग्रामविकासमंत्री,पालकमंत्री  यांना पाठवण्यात आल्या आहेत. या निवेदनावर शिक्षक नेते आबासाहेब जगताप,रा.या.औटी,बापू तांबे,संजय कळमकर,संजय शेळके,संजय धामणे,शिक्षक बँकेचे अध्यक्ष साहेबराव अनाप,कैलास चिंधे,प्रवीण ठुबे,रविंद्र पिंपळे,राजेंद्र निमसे,राजेंद्र शिंदे,आबा लोंढे,सचिन नाबगे, आदींच्या सह्या आहेत.

या निवेदनात म्हंटले आहे कि,प्रभारी शिक्षणाधिकारी शबाना शेख व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे हे कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना प्रचंड मानसिक त्रास देत आहेत.वेळोअवेळी कोणतीही माहिती मागविली जाते.परत त्या सोशल मिडीयावर स्वीकारत नाहीत.कुठल्याही कामासाठी शिक्षकांना पंचायत समितीत येवू दिले जात नाही.त्यांच्या वेतन निशितेच्या नोंदी अपूर्ण ठेवल्या जातात.जेथे कोणत्याच सुविधा नाही अश्या ठिकाणी दिवसभर आढावा बैठका घेतात.यात दिव्यांग महिला व वयस्क शिक्षकांना प्रचंड त्रास होतो.याची तक्रार मानवधिकार आयोगाकडे केली जाणार आहे. परजणे ह्या बैठकांना उपस्थित असतात.वयस्क व महिला शिक्षकांना अपमानस्पद भाषेत बोलतात.थोडा उशीर झाला तरी तासनतास बाहेर उभे करतात.पंचायत समितीत बोलवून नियमबाह्य नोटीसा काढतात.नियमानुसार जिल्हा परिषद सदस्याला इतके अनिर्बंध अधिकार नाहीत.

राजकीय पाठबळाच्या जोरावर शेख यांची हुकमशाही सुरु आहे.सोनवणे या मुख्याध्यापकाने यातूनच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.शेख यांनी त्यांना शाळेत जाऊन तक्रार नोंदवू नका असा दम दिला.त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला.त्यांना कोपरगाव मध्ये खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.शेख यांच्यावर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. 

जाहिरात

shadow

संबंधित