शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना बलात्काराचा 'डेमो'

वेध

ब्रेकिंग न्यूज

shadow

विजयवाडा (APLive24):आंध्र प्रदेशात एका सरकारी प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन शिक्षकांनी भर वर्गात विद्यार्थ्यांना बलत्कार कसा करावा याचा डेमो दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजवाड्याच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात चिंतलपुडी येथे हा प्रकार उघडकीस आला असून गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकांना जबर मारहाण केली आहे. 


पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. तर जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी सीव्ही रेणुका संबंधित शाळेची भेट घेणार असून स्वत: सर्व माहिती जाणून घेणार आहेत. रेणुका यांना देण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात अशाप्रकारची कोणतीच घटना घडलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तर शाळेच्या तिसरीच्या वर्गातील तीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली असून यात दोन विद्यार्थी आणि एक विद्यार्थीनीला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 

दुखापतग्रस्त झालेल्या विद्यार्थीनीचा वापर बलात्काराचा डेमो देण्यासाठी केला गेल्याची कोणतीही माहिती सध्यातरी माझ्यापर्यंत आलेली नाही, असं रेणुका यांनी सांगितलं आहे. पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. 

जाहिरात

shadow

संबंधित