आम्ही दबावाखाली काम करत नाही; केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून शिक्षकांकडून लेखी

शिक्षण

ब्रेकिंग न्यूज

shadow

कोपरगावच्या प्रकरणात नवा ट्विस

कोपरगाव(APLive24): कोपरगावच्या प्रभारी शिक्षणाधिकारी शबाना शेख व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या मनमानी व हुकुमशाही कार्यपद्धतीमुळे कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक प्रचंड मानसिक तणावात आहेत. त्यामुळे दोन महिन्यात दोन प्राथमिक शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.परजणे यांचा हस्तक्षेप तातडीने थांबवा व शेख यांची चौकशी होऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक अहमदनगर जिल्हा परिषद वा कोपरगाव पंचायत समितीवर मोर्चा काढतील असा इशारा प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा समन्वय समितीने देताच कोपरगाव तालुक्यातील प्रतेक शाळेत केंद्रप्रमुखाना पाठवून शिक्षकांकडून आम्ही दबावाखाली काम करत नाही असे लेखी लिहून घेण्याचा अजब फतवा सुरु केला आहे.  

कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विभागातील मनमानी कारभारामुळे प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.दोन शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र या विरोधात कुणीच भूमिका घेत नव्हते.सलग चार दिवस APLive24 ने या विषयावर आवाज उठवल्याने आता प्राथमिक शिक्षक संघटना जाग्या झाल्या असून गुरुवारी  संध्याकाळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना  निवेदन देण्यात आले.हे निवेदन देवू नये यासाठी मध्यस्थाच्या माध्यमातून एका जिल्हा पातळीवरील शिक्षक नेत्यावर दबाव आणला जात होता. पण सर्व संघटना एकत्र आल्यामुळे निवेदन काढावे लागले.आता निवेदन काढल्यामुळे संबधीतानी केंद्र प्रमुखांना तालुक्यातील प्रतेक शाळेत जाऊन शिक्षकांवर दबाव टाकून आम्ही दबावाखाली काम करत नसल्याचे लेखी लिहून घेण्याचा फतवा काढला आहे.  या संदर्भात  मुख्याध्यापकांच्या बैठका सध्या घेतल्या जात आहेत. असे लेखी देवू नये असे आवाहन कोपरगाव तालुका शिक्षक समन्वय संघटना करत आहे.

 शबाना शेख यांची बदली झालेली असताना त्यांना कोपरगावच्या या खुर्चीत इतका रस का आहे? तीन वेळा त्यांनी बदली रद्द क्ररुन आणली कि केली हे सर्वश्रुत आहे.त्यांच्यावर असणारा राजकीय वरदहस्त त्यांना इतरत्र कुठे बदलून जाऊ देत नाही. जिल्हा प्रशासन डोळे झाकून बसले आहे.  

-आढाव,माळवे,कानडे,मोरे..इतना सन्नाटा क्यो है भाई  

कोपरगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना इतका मानसिक त्रास दिला जात असताना आज पर्यंत शिक्षक संघटना गप्प होत्या.APLive24 ने यावर आवाज उठवल्यावर जिल्ह्याचे नेते जागे झाले पण स्थानिक पातळीवर अजूनही शांतता आहे. गुरुमाउलीच्या विद्युलता आढाव,गुरुकुलचे अशोक कानडे,सदिछाचे ज्ञानेश्वर माळवे,इबटाचे बाळासाहेब मोरे हे कोपरगावचे शिक्षक नेते जिल्ह्याचे नेतृत्व करतात पण तेच अजून गप्प असल्याने स्थानिक शिक्षक पण गप्प आहेत. हे नेते कुणाच्या दबावाला घाबरत आहेत? यांनी दबाव झुगारला तर स्थानिक तालुका पातळीवरचे गुरुजी आश्वस्त होतील. कोपरगाव तालुक्यातील एका महिला शिक्षिकेने याबाबतचे APLive24 चे वृत्त सोशल मिडीयावर शेअर केले म्हणून त्यांची शाळा तपासण्यात आली! 

जाहिरात

shadow

संबंधित