APLive24 Watch:कोपरगावच्या गुरुजींनी कुणाच्याही दबावाला बळी पडून लेखी देऊ नये

शिक्षण

ब्रेकिंग न्यूज

shadow

जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे आवाहन 

अहमदनगर/कोपरगाव(APLive24): कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता व न घाबरता कोणत्याही केंद्र प्रमुखाला वा प्रशासकीय अधिकाऱ्याला काहीच लेखी लिहून देऊ नये,जिल्ह्यातील सर्व शिक्षक तुमच्या पाठीशी आहेत असे आवाहन करत याबाबत मंगळवारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांची भेट घेतली जाणार आहे,अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली.
 प्रभारी शिक्षणाधिकारी शबाना शेख व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या मनमानी व हुकुमशाही कार्यपद्धतीमुळे कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक प्रचंड मानसिक तणावात आहेत. त्यामुळे दोन महिन्यात दोन प्राथमिक शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.परजणे यांचा हस्तक्षेप तातडीने थांबवा व शेख यांची चौकशी होऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक अहमदनगर जिल्हा परिषद वा कोपरगाव पंचायत समितीवर मोर्चा काढतील असा इशारा प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा समन्वय समितीने देताच कोपरगाव तालुक्यातील प्रतेक शाळेत केंद्रप्रमुखाना पाठवून शिक्षकांकडून आम्ही दबावाखाली काम करत नाही असे लेखी लिहून घेण्याचा अजब फतवा सुरु केला होता.त्यामुळे जिल्हा समन्वय समितीने हे आवाहन केले आहे.
शिक्षक नेते आबासाहेब जगताप,संजय कळमकर,रा.या.औटी,बापू तांबे,साहेबराव अनाप,संजय शेळके,राजेंद्र शिंदे,संजय धामणे,राजेंद्र निमसे,आबा लोंढे,कैलास चिंधे,प्रवीण ठुबे,सचिन नाबगे,रविंद्र पिंपळे,इमाम सय्यद,बाळासाहेब मुखेकर,शरद कोतकर,राजेंद्र ठोकळ,बाळासाहेब कदम,रामदास भापकर,बेबीताई तोडमल,वृषाली कडलग,संगीता घोडके आदींनी कोपरगाव तालुक्यातील शिक्षकांना धीर देत न घाबरण्याचे आवाहन केले आहे.
प्राथमिक शिक्षक संघ,प्राथमिक शिक्षक समिती,अखिल भारतीय शिक्षक संघ,इब्टा,जुनी पेन्शन हक्क संघटना,मुख्याध्यापक संघ,पदवीधर व केंद्र प्रमुख संघ,शिक्षक सेवा संघ,मागासवर्गीय शिक्षक संघटना,दिव्यांग शिक्षक संघटना,अल्पसंख्यांक उर्दू संघटना,जिल्हा महिला आघाडी या जिल्ह्यातील  सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यानिमित्ताने एकत्र आल्या आहेत.

 

 

 

जाहिरात

shadow

संबंधित