बेल्ह्यात सेल्फीने घेतला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बळी

वेध

ब्रेकिंग न्यूज

shadow

जुन्नर(APLive24):सेल्फीचा नाद येवला तालुक्यातून शिक्षणासाठी बेल्हे(बांगरवाडी)येथे आलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला आहे. शेततळ्यात उतरलेला विद्यार्थी आज(रविवारी)दुपारी सेल्फी घेताना बुडाला.
 
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला या घटनेत मृत झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे श्याम घोडके(वय१९वर्ष,रा.येवला,सध्या राहणार बांगरवाडी)असे नाव असून तो अभियांत्रिकी पदव्युत्तर विभागात शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता.
 
बांगरवाडी येथील समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालया ला आज(रविवारी)सुट्टी असल्याने श्याम घोडके(वय १९ वर्ष,राहणार येवला,सध्या राहणार बांगरवाडी,बेल्हे हा विद्यार्थी दुपारी महाविद्यालयापाठीमागे एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतातील शेततळ्यात सेल्फी काढण्याच्या उत्साहाच्या भरात पाण्यात जाऊ लागला.सेल्फीच्या नादात शेततळ्यातील पाण्याचा अंदाज लक्षात न आल्याने तो पाण्यात पडला,पोहता येत नसल्याने तो विद्यार्थी बुडाला,आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली,या घटनेची माहिती बेल्हे पोलीस दुरक्षेत्राचे पोलिस नाईक नरेंद्र गोराणे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली,घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शेततळ्यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला,अशी माहिती बेल्हे पोलिसांनी दिली.
 
दरम्यान याबाबत संध्याकाळी  उशिरापर्यंत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे त्याच्याकडील नोंदीची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

जाहिरात

shadow

संबंधित