श्रीरामपूर : बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई, 7 जणांना अटक

वेध

ब्रेकिंग न्यूज

shadow

श्रीरामपूर(APLive24): शहरातील गोंधवणी परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शहर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. मुलींना अनैतिक मार्गाला लावत देहविक्री करणाऱ्या महिलेसह बंगल्याच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. तिघे आंबट शौकिनही जाळ्यात अडकले आहेत. आरोपींवर पिटाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पिटा अंतर्गत कारवाई होण्याची शहरातील ही दुसरी वेळ आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस कोठडीत रवानगी झाल्यानंतर आरोपींकडून आणखी माहिती मिळेल असे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मी उर्फ प्रिती राजेश माखिजा (वय 32, गोंधवणी), अशोक दामोधर देशमुख (गोंधवणी) तसेच नानासाहेब जगन्नाथ शेळके वय 29, लाडगाव, ता.श्रीरामपूर), प्रकाश विलास दौंड (वय 36, मातापूर), श्रीकांत कैलास अनारसे (वय 24, वडाळा महादेव), सतीश दिलीप मेटे (वय 22, उंबरगाव), अनिल जगन्नाथ शेळके (वय 25, लाडगाव) यांचा समावेश आहे.

आरोपी महिला लक्ष्मी माखेजा ही गोंधवणी येथे देशमुख यांच्या बंगला भाड्याने घेऊन राहत होती. ती मूळ बेलापूर येथे असून कोपरगाव येथे तिचे सासर आहे. ती सध्या एकटी राहते. आरोपी नानासाहेब शेळके व प्रकाश दौंड यांच्यासह आर्थिक फायद्यासाठी पीडित मुलीकडून ते देहविक्रीचा व्यवसाय करत होते. पीडित ही औरंगाबाद येथील चोवीस वर्षीय तरुणी आहे. पोलीस तिच्याकडून माहिती मिळवत आहेत.

जाहिरात

shadow

संबंधित