पारनेर:राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा उद्या निघोजमध्ये

राजकारण

ब्रेकिंग न्यूज

shadow

पारनेर(APLive24):आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे मंगळवारी (६ ऑगस्ट) शिवनेरीहून सुरू करण्यात येणारी शिवस्वराज्य यात्रा तेथून निघाल्यावर सर्वप्रथम नगर जिल्ह्यात येणार आहे. दोन दिवसांच्या येथील वास्तव्यात ही यात्रा तीन ठिकाणी रोड शो, कॉलेज कॉर्नर बैठका व जाहीर सभा घेणार आहे. नव्याने खासदार झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व खासदरा उदयनराजे भोसले या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी जिल्हा राष्ट्रवादीने सुरू केली आहे.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही खासदार डॉ. कोल्हे व खासदार भोसलेंच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा नियोजित केली आहे. 'लढा गद्दारांशी...लढा फितुरांशी...रयतेच्या राज्यासाठी व रयतेच्या हक्कासाठी शिवस्वराज्य यात्रा' असे ब्रीदवाक्य घेण्यात आले आहे. ६ रोजी शिवनेरीहून सुरुवात झाल्यावर सर्वात आधी ही यात्रा नगर जिल्ह्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी ७ वाजता पारनेर तालुक्यातील निघोज येथे तिचे स्वागत होणार आहे. त्यानंतर तेथे रोड शो व जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर बुधवारी (७ ऑगस्ट) सकाळी ९ ते १२ या दरम्यान नगर शहरात रोड शो, न्यू आर्ट्स महाविद्यालयाजवळ जाहीर सभा होणार आहे. पुढे ही यात्रा दुपारी २ वाजता शेवगावला जाणार असून, तेथेही रोड शो व सभा झाल्यावर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरला जाणार आहे.

जाहिरात

shadow

संबंधित