कोपरगाव शहराला महापुराचा विळखा, अनेक घरांमध्ये घुसलं पाणी

चालूघडामोडी

ब्रेकिंग न्यूज

shadow

कोपरगाव(APLive24):गोदावरी नदीला आलेल्या महापुरानं अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव शहराला पाण्याने विळखा घातलाय. शहरात येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील अनेक उपनगरांमध्ये, दुकानात आणि घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून जवळपास 3 लाख क्युसेक्सने पाणी नदीपात्रात झेपावत होते त्यामुळे गोदावरी नदी आपलं पात्र सोडून बाहेर पडली आहे.शाळा,महाविद्यालय यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.रात्री बारा वाजण्याच्या सुमरास स्वामी समर्थ मंदिराच्या पायरीस पाणी लागण्यास सुरवात झाल्यानंतर लीम्बारा मैदान,गजानन नगर,खंदक नाला या भागात पुराचे पाणी घुसले.

गोदावरी नदीच्या काठी असणाऱ्या अनेक गावांमध्येही पाणी घुसले असून सर्वात जास्त फटका कोपरगाव शहराला बसलाय. धोक्याचा इशारा असल्याने प्रशासकीय यंत्रणा अगोदरच सज्ज झाली होती. त्यांनी पुराचे पाणी ज्या परीसरात जावू शकते असा सगळा परीसर अगोदरच रिकामा करण्यात आला होता.

सध्या कोपरगाव शहराला छावणीचे स्वरूप आले असून अनेक नागरिक शाळा महाविद्यालयात आश्रयाला आले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नदीतील पाण्याचा प्रवाहही 2 लाख क्युसेक्सवर आला आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय.

जाहिरात

shadow

संबंधित