पारनेर:सुजित झावरेंचे ठरेना भाजप की अपक्ष?

राजकारण

ब्रेकिंग न्यूज

shadow

राष्ट्रवादीच्या आजच्या जनस्वराज्य यात्रेवर बहिष्कार

पारनेर(APLive24): शिवसेनेचे बंडखोर नेते निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे युवा शिलेदार सुजित झावरे राष्ट्रवादीत एकाकी पडले आहेत. त्यांना पक्षाकडून सतत दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. विधानसभेला सेना-भाजपा युती झाली नाही तर भाजपकडून अन्यथा अपक्ष प्रयोगाची चाचपणी त्यांच्याकडून सुरु आहे. राष्ट्रवादीच्या आजच्या कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रणच नाही त्यामुळे त्यांच्या गटाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

बाजार समितीत झावरे समर्थक ९ संचालकांनी राजीनामे दिले असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. येत्या विधानसभेला सेनेला कितीही वाटत असले भाजपा आपल्या सोबत असेल मात्र वस्तुस्थिती तशी नाही. सेनेला टांग मारून कमळाबाई वेगळा संसार थाटू शकते असा राजकीय रंग आहे. त्यामुळे पारनेर मधून सुजित झावरे भाजपच्या वाटेवर आहेत.त्यांनी नुकतीच मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली.पण जर सेना-भाजप युती अभेद्य राहिली तर ते अपक्ष लढतील असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.याचा अर्थ असा कि,आता राष्ट्रवादीचे तिकीट आपल्याला मिळणार नाही याचा अंदाज झावरे गटाला आला आहे. 

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने वेळी जिल्ह्यातुन सर्वात प्रथम स्व.वसंतराव झावरे यांनी प्रवेश केला. झावरे यांनी तालुक्यात पक्ष घरोघरी पोहचला आमदार,जिल्हा परिषद,पंचायत समिती,बाजार समिती मध्ये पक्षाची सत्ता आणली पक्षाच्या पडत्या काळात सुजीत झावरे यांनी संघटना वाढवली आणि आता त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस जनस्वारज्य यात्रा काढत आहेत.जनाधार असलेल्या माणसाला डावलुन पक्षाला नेमके काय साध्य करायचे आहे असा सवाल झावरे समर्थक करत आहेत.

निघोज(ता.पारनेर)येथे आज  (ता.६)रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची जनस्वराज्य  यात्रा येत आहे यावेळी पक्षाचे वरीष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,ज्येष्ठ नेते दिलीप वळसे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार डॉ अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत.
या यात्रेत सुजित झावरे व पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याने पक्षातील कार्यकर्त्यांनी तिव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
निष्ठावंताना डावलुन जे कोणी आयात घेतले आहेत त्यांना घेऊन हा कार्यक्रम सुरू आहे ज्यांना जनमत नाही ते ग्रामपंचायत किवा सेवा संस्थेत निवडून येत नाहीत त्यांना पदे दिले जातात अश्या पद्धतीने पक्षाची वाटचाल सुरू आहे त्यामुळे या यात्रेत आम्ही सहभागी होणार नसल्याचे झावरे समर्थक सांगत आहेत.

जाहिरात

shadow

संबंधित