नारायणगव्हाण परीसरात हंगा येथील तरूणाची ती आत्महत्या अनैतिक संबंधातूनच

चालूघडामोडी

ब्रेकिंग न्यूज

shadow

पारनेर(APLive24): तालुक्यातील हंगा येथील मोहन सदाशिव दळवी (वय-३७) यांनी नारायणगव्हाण येथिल चुंभळेश्वर मंदिरातील घंटीच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि.२९ रोजी सायंकाळी ६.३६ वाजता घडली.ही आत्महत्या अनैतिक संबंधातून केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 
     याबाबत किसन दगडू बनकर वय ३७  रा. हंगा ता.पारनेर जि- अ.नगर यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली दिली होती.मात्र हि आत्महत्या नसून घात केला असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी व्यक्त करत शवविच्छेदनास पारनेर येथील रुग्णालयात विरोध केला.आमचा नगर येथील रुग्णालयात देखिल शवविच्छेदनास विरोध असून पुणे येथे पाठवावे असा आग्रह धरल्याने अखेर मृतदेह पुढील कारवाईसाठी पुणे येथे पाठविण्यात आला.
    सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी मोहन यांचे वडील सदाशिव बाजीराव दळवी धंदा शेती रा- हंगा शिवार ता- पारनेर जि- अ.नगर यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
     याबाबत सुपा पोलिस स्टेशनवरुन मिळालेली माहिती अशी की,मोहन दळवी व गावातील एका महिलेचे अनैतिक संबंध होते व ती मोहन यांस वेळोवेळी फोन करून व समक्ष भेटून पैशाची मागणी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने यातील मोहन यांनी महीलेच्या धमकी व पैशाच्या मागणीला कंटाळून आत्महत्त्या करण्यास भाग पाडल्यानेच त्याने गळफास घेवून आत्महत्त्या केली आहे. याशिवाय त्याचे मरणास काहीएक कारण नसल्याचे मोहन यांचे वडील सदाशिव बाजीराव दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
      याबाबत सुपा पोस्टे आ.मृ रजि नंबर २१/२०१९  सीआरपीसी १७४ चौकशी वरून तसेच सदाशिव दळवी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले हे करत आहे.

जाहिरात

shadow

संबंधित