जुन्नर:राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेस शिवनेरीवरून प्रारंभ

राजकारण

ब्रेकिंग न्यूज

shadow

जुन्नर(APLive24): नव्या स्वराज्याचा नवा लढा’ अशी घोषणा देत शिवस्वराज्य स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ झाला असून जनतेशी संवाद साधण्यासाठी जुन्नर येथील पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. अमोल कोल्हे, राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आ. विद्या चव्हाण इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेची खिल्ली उडवत जोरदार टिकास्त्र सोडले. काही लेक संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतात जात आहेत. मात्र त्यांची अवस्था, ‘बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं’ अशी झाली असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांच्यावर कोल्हे यांनी संवाद यात्रेवर टीका केली.

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसी केबिनमध्ये बसून राज्य चालवत होते. आज महाराष्ट्रात पूर असताना मुख्यमंत्री ट्विटवर मदतीची मागणी करत असल्याचेही कोल्हे म्हणाले. मोदी सरकारने कलम ३७० हटवले, या निर्णयाचे स्वागत. काश्मीरच्या विकासाचे कौतुक आहे. मात्र हा निर्णय घेत असताना ढासळलेली अर्थव्यवस्था झाकण्याचा तर प्रयत्न तर होत नाही ना? याचाही डोळसपणे विचार करायला हवा,असे कोल्हे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची यात्रा महाजनादेश यात्रा नसून महाधनादेश यात्रा आहे. महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले. एकिकडे मीच मुख्यमंत्री राहणार हे सांगण्यासाठी ही यात्रा आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची यात्रा मी मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी आहे. पण शिवस्वराज्य यात्रे ही मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या तिन्हीं यात्रेचा फरक जनतेने समजून घ्यावा, असे आवर्जून सांगितले.

 

 

जाहिरात

shadow

संबंधित