पारनेरला जनतेच्या मनातील उमेदवार देऊ:अजित पवार

राजकारण

ब्रेकिंग न्यूज

shadow

मधुकर पिचड-बबनराव पाचपुते घोटाळेबाज;त्यांच्यावर कारवाई करणार का?

पारनेर(APLive24):विधानसभेला पारनेरला राष्ट्रवादीचा उमेदवार हा तरुण व तुम्हा जनतेच्या मनातील असेल असे सुतोवाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले,तर  मधुकर पिचड व बबनराव पाचपुते यांनीही घोटाळे केले आहेत मग त्यांना पण आता तुरंगात टाकणार की भाजपमध्ये आल्यामुळे पावन करून घेणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

शिवनेरीहुन निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेचे नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात  स्वागत करण्यात आले. मात्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे गटाने या यात्रेवर बहिष्कार टाकला होता.यावेळी निघोज येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार डाँ. अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील,महीला प्रदेश अध्यक्ष  रूपाली चाकणकर,आमदार विद्याताई चव्हाण, माजी.आमदार पोपटराव गावडे,माजी आमदार दादाभाऊ  कळमकर, राजेन्द्र फाळके युवक प्रदेश अध्यक्ष  मेहबूब शेख,अंकुश काकडे, लोकनेते निलेश लंके, प्रदिप वळसे,  मधुकर उचाळे, अशोक सावंत, सभापती प्रशांत गायकवाड, बाबाजी तरटे ,सुवर्णा धाडगे,दिपक पवार,शैलेश मोहीते,अशोक घुले,सुदाम पवार,दादा शिंदे,विक्रम कळमकर आदी उपस्थित होते .
प्रास्ताविक करताना  निलेश लंके म्हणाले, मला काहीही नको फक्त माझ्या पारनेरच्या जनतेला हक्काचे पाणी मिळाले पाहीजे. तालुक्याच्या पाणी, रस्ते व बेरोजगारी या समस्या सोडविण्यासाठीच माझा प्रयत्न राहील यासाठी जनतेने पाठींबा द्यावा.

जाहिरात

shadow

संबंधित