APLive24 Watch:कोपरगावचा स्थानिक गुरुजी पण आता लढणार!

शिक्षण

ब्रेकिंग न्यूज

shadow

जिल्हा समन्वय समिती आज जिल्हा परिषद अध्यक्षाना भेटणार;नव्या सीईओंची प्रतीक्षा  

कोपरगाव(APLive24): राजकीय वरदहस्तामुळे कोपरगावच्या प्रभारी शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची चालवलेली छळवणूक स्थानिक गुरुजी भीतीपोटी निमुटपणे सहन करत होता. गेल्या दोन महिन्यात दोन शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरी कुणी चकार शब्द बोलत नव्हते. APLive24 ने या विषयावर सतत प्रकाश टाकल्याने शिक्षकांच्या जिल्हा पातळीवरील संघटना जागृत झाल्या,मात्र तरीही स्थानिक शिक्षकांमध्ये दहशत कायम होती. ती आता हळूहळू कमी होऊ लागली असून स्थानिक प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने काल शिक्षक बँकेच्या कोपरगाव शाखेत बैठक घेवून या अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 यावेळी गुरुमाऊलीच्या नेत्या विद्युलता आढाव,गुरुकुलचे नेते अशोक कानडे, सदीच्छाचे  ज्ञानेश्वर माळवे,इब्टाचे बाळासाहेब मोरे,शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष रमेश दरेकर, विलास गवळी, रामदास गव्हाणे यांच्यासह स्थानिक शिक्षक संघटनाचे सुमारे वीस प्रतिनिधी हजर होते.यात निवेदन तयार करून सर्वाना लेखी तक्रार देण्याचा निर्णय झाला.तसेच जिल्हा समन्वय समिती आंदोलनाबाबत जी भूमिका घेईल त्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्याचा निर्धार केला. तसेच तालुक्यातील शिक्षकांनी कोणच्याही दबावाला बळी न पडता केंद्र प्रमुखांना काहीच लेखी लिहून देवू नये असे आवाहन करण्यात आले. ज्या सोनवणे या शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा समन्वय समिती याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना भेटणार होते,मात्र त्यांची अचानक बदली झाल्याने आता नव्या सीईओची प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरम्यान,याविषयावर आज जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांची समन्वय समिती भेट घेणार आहे.

 

 

 

 

जाहिरात

shadow

संबंधित