मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले

अहमदनगर

ब्रेकिंग न्यूज

shadow

राहुरी(APLive24):अहमदनगर जिल्ह्यातील  सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. आमदार शिवाजी कर्डिले यांनी कळ दाबल्यानंतर मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले.
२६ टीएमसी क्षमता असलेल्या मुळा तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. त्यामुळे आज सायंकाळी ५ वाजता धरणातून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणा-या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

धरणातून ११ मो-यातून पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे खाते पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेऊन असल्याचे मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.

जाहिरात

shadow

संबंधित