जामखेड:व्याजाचे पैसे न दिल्याने केले अपहरण

अहमदनगर

ब्रेकिंग न्यूज

shadow

जामखेड(APLive24): व्याजाचे पैसे न दिल्याने सावकाराने अपहरण करून एकास मारहाण केली. या प्रकरणी तीन जणांविरोधात सावकारकीसह अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रशांत मारुती शिंदे (रा. जवळा, ता. जामखेड) यास आरोपी सावकार आलेश बापूराव जगदाळे (रा. आपटी, हल्ली रा. जामखेड) व इतर दोघांनी नगर रोड येथील एका हॉटेल समोर बोलावून घेतले. तसेच व्याजाच्या पैशावरून फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यानंतर फिर्यादीस मोटारसायकलवर बसवून त्याचे अपहरण केले. तसेच खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले.

शिंदे यांनी आरोपींच्या ताब्यातून शिताफीने आपली सुटका करून घेतली. त्यानंतर तातडीने जामखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच वरील तीन आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे हे करत आहेत. मे 2019 महिन्याही जामखेड पोलीस ठाण्यात सावकारकीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा अवैध खासगी सावकारकी करणाऱ्या तीन सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने तालुक्‍यातील खाजगी सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

जाहिरात

shadow

संबंधित