अहमदनगर:जिल्हा शिक्षक संघाची कार्यकारणी बरखास्त करून नव्याने कार्यकारणी करणार

अहमदनगर

ब्रेकिंग न्यूज

shadow

 गुरुमाऊली मंडळाच्या आमसभेत निर्णय

अहमदनगर(APLive24):जिल्हा शिक्षक संघाची कार्यकारणी बरखास्त करून नव्याने कार्यकारणी करणार असल्याचा निर्णय गुरूमाऊली मंडळाच्या आमसभेत घेण्यात आला.

 आज दिनांक 11 ऑगस्ट  रोजी गुरूमाऊली मंडळाची आम सभा मंडळाचे अध्यक्ष बापुसाहेब तांबे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी राज्य संघाचे निरिक्षक म्हणून आबासाहेब जगताप व केंद्रप्रमुख संघाचे राज्य सरचिटणीस निळुअण्णा घायतडक हे उपस्थित होते. व्यासपीठावर राज्य सघ सदस्य कैलास चिंधे, दत्ता कुलट तसेच जिल्हा उच्चअधिकार समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे,विकास मंडळ सल्लागार मोहनराव पागिरे,बॅंकेचे चेअरमन  साहेबराव अनाप,व्हाईस चेअरमन बाळासाहेब मुखेकर व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. 

या आमसभेत सुरूवातीला गेल्या साडेतीन वर्षात प्रथमच आमसभा होत असल्याबाबत उपस्थित सभासदांनी धन्यवाद दिले.बॅंकेचा कारभार व विकास मंडळाचा कारभार  यावर चर्चा झाली. यात माजी चेअरमन रावसाहेब रोहोकले व संघाचे अध्यक्ष संजय शेळके यांच्यावर जोरदार  टिका करण्यात आली.

 सेवानिवृत्तीनंतरही रोहोकलेनां पदाचा अट्टाहास का?तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे व सल्लागार यांच्यावर ही मंडळात फुट पाडल्याचा आरोप करण्यात आला. 

वास्तविक पाहता बॅंकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडी लोकशाही मार्गाने झाल्या आहेत.नुकताच कारभार सुरु केला आहे, त्यापूर्वीच संचालक मंडळ व इतर नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करून रोहोकले व त्यांची टीम बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.रोहोकलेनां लोकशाही मान्य नसुन एकाधिकारशाहीने मी म्हणेल तेच योग्य म्हणून जिल्हाभर वातावरण दूषित करीत आहेत. तालुका तालुक्यात जाऊन गुरूमाऊली मंडळ भक्कम करण्याऐवजी फुट पाडण्याचे काम करीत आहे याचा सभासदांनी निषेध केला. 

विकास मंडळाबाबतही सभेत जोरदार चर्चा झाली, रोहोकलेंच्या काळात बॅंकेचा सभासद हा विकास मंडळाचा सभासद हे धोरण गुरूमाऊली मंडळाने दिले होते, मग रोहोकले बॅंकेचे सभासद नाहीत सभासद नसल्याने विकास मंडळाचेही सभासद नाहीत परंतु विकास मंडळात खोटे-नाटे करून रोहोकले विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.10 ते 12 कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प उभा राहत असताना जिल्हातील सर्व संघटना,मंडळाना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना ठराविक बगलबच्चांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने काम करीत आहे,पुढील काळात विकास मंडळाबाबत सर्वसमावेशक भुमिका मांडून काम करावे लागेल त्यासाठी जिल्हातील सर्व संघटनांना व शिक्षकांना विश्वासात घेतले जाईल.

या आमसभेत अनेक सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले व चांगल्या निवडीबद्दल अभिनंदन केले तसेच पुढील काळात चांगले काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्या. कर्जाचा व्याजदर, मयतनिधी,व इतर योजनाबाबत ही चर्चा झाली, नजीकच्या काळात चांगल्या कारभारासाठी पाठबळ देण्याचे सांगितले व बॅंकेचा कारभार सभासद हिताचा ,भ्रष्टाचार मुक्त, व पारदर्शी करून विश्वास अधिक वृद्धींगत करू असे सांगितले. 

यावेळी बाळासाहेब सालके,सुनील गायकवाड, वसंत शिंदे, सचिन नाबगे, आरोळे सर,राजकुमार साळवे,किशोर माकोडे,विठ्ठल काकडे,प्रमोद शिर्के,विठ्ठल काळे,दत्ता चोथे,महेश फुंदे,ना चि शिंदे यासह अनेक सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या सभेसाठी सर्वश्री.बाळासाहेब सरोदे,बाळासाहेब तापकीर,विदयात्ताई आढाव,नारायण जठार,महेश भणभणे, रामेश्वर चोपडे, शरद बोरूडे, संदीप ठाणगे, सुयोग पवार,सतिश कार्ले, एकनाथ चव्हाण तसेच जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने गुरूमाऊली व संघप्रेमी सभासद उपस्थित होते.

 

जाहिरात

shadow

संबंधित