पारनेर: शिवसेना युवा तालुका प्रमुखांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तिघांना अटक

अहमदनगर

ब्रेकिंग न्यूज

shadow

पारनेर(APLive24): तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये शनिवार दि.१० रोजी दुपारी ३.३० वाजता ठेकेदारी मिळण्यावरून दोन गटात बाचाबाची झाली व त्यांचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले.पोलिस प्रशासनाने तरुणांना पांगविण्यासाठी जोरदार लाठीचार केला.
     याबाबत योगेश बाबाजी परांडे वय- २४ वर्षे धंदा-शेती रा.घाणेगाव ता-पारनेर जि- अ.नगर यांच्या फिर्यादीवरून युवा सेना तालुका अध्यक्ष नितीन शेळके (रा.वाडेगव्हाण ता.पारनेर),राहुल यादव (रा.यादववाडी ता.पारनेर),अजय विठ्ठल शेळके,विजय विठ्ठल शेळके (दोघे.रा.नारायणगव्हाण ता.पारनेर),किशोर यादव (रा.वाडेगव्हाण ता.पारनेर),राहुल ढोरमले,तुषार ढोरमले (दोघे.रा.जातेगाव ता.पारनेर),तुषार गुजर (रा.गुजरमळा ता.शिरूर जि.पुणे),केतन मल्लाव (रा.शिरूर जि.पुणे) यांच्या विरोधात सुपा पोलीस स्टेशनला शनिवारी रात्री उशिरा ११.०४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापैकी तुषार ढोरमले, राहुल ढोरमले दोघे राहणार जातेगाव ता.पारनेर,विजय शेळके रा.वाडेगव्हाण ता.पारनेर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
        याबाबत सुपा पोलिस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की, योगेश बाबाजी परांडे राहणार घाणेगाव व त्याचे मित्र पळवे शिवारात हॉटेल भिमाशंकर येथे हॉटेलवल चहा पित असताना यातील आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्रीत जमवून योगेश परांडे व त्यांच्या मित्रांना तुम्ही सुपा एमआयडीसी मध्ये जायचे नाही असे म्हणून वाईटसाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.असल्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजी दाखल करण्यात आला आहे.पुढिल तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.को साबळे, खंडू शिंदे व त्यांचे सहकारी करत आहे.
     दरम्यान सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये म्हसणे फाटा परीसरात मोठ- मोठे उद्योग उभारणीचे काम सुरू आहे.याठीकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या हाताला काम मिळणे आवश्यक असताना बाहेरच्या लोकांनी विविध कंपन्यांमध्ये कामाचा ठेका घेतला आहे.यामुळे याठिकाणी नेहमीच वाद निर्माण झाले आहेत.एका महिन्यात वाद होण्याची ही तिसरी घटना आहे.यावर पोलिस प्रशासनाने खमकी भुमिका घेणे महत्त्वाचे आहे.
 
 

जाहिरात

shadow

संबंधित