अहमदनगर:छाननीनंतर बारा मतदारसंघात 189 उमेदवार

राजकारण

shadow

अहमदनगर(APLive24): विधानसभा सार्वत्रिक निवड़णुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची आज संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात छाननी करण्यात आली. विविध उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यात बारा मतदारसंघात छाननीनंतर 189 उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर पर्यंत असून त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होईल.  

        अकोले मतदारसंघातून छाननीमध्ये एक अर्ज अवैध ठरला. छाननीनंतर ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे- घाणे भिवा रामा (अपक्ष), डॉ.किरण यमाजी लहामटे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), पिचड वैभव मधुकरराव (भाजपा), गणेश काशिनाथ मधे (अपक्ष), सौ. शकुंतला भाऊसाहेब धराडे (अपक्ष), दीपक पथवे (वंचित बहुजन आघाडी).

        संगमनेर विधानसभा मतदारसंघात ११ जणांनी २० नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीनंतर एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने आता रिंगणात ११ उमेदवारांचे १९ नामनिर्देशनपत्रे राहिली आहेत. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे- विजय उर्फ बाळासाहेब थोरात (भारतीय राष्ट्रीय क़ॉग्रेस), बापू पाराजी रणधीर (अपक्ष), साहेबराव रामचंद्र नवले (शिवसेना), अविनाश हौशीराम भोर (अपक्ष), कलीराम बहिरु पोपळघट (अपक्ष), शोभा संजय फड (अपक्ष), शरद ज्ञानदेव गोर्डे (मनसे), सूर्यभान बाबूराव गोरे (बसपा),  बापूसाहेब भागवत ताजणे (वंचित बहुजन आघाडी), सचिन मारूती शिंदे (अपक्ष), संपत मारूती कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी).

        शिर्डी मतदारसंघात ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे- राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (भाजप), सुरेश जगन्नाथ थोरात (इंडियन नॅशनल काँग्रेस), जगताप शिमोन ठकाजी (बहुजन समाज पार्टी), कोळगे विशाल बबन (वंचित बहुजनआघाडी), अल्ताफ इब्राहिम शेख (अपक्ष), राजेंद्र सखाराम पठारे (अपक्ष), विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष), डॉ. शेखर भास्करराव बोऱ्हाडे (अपक्ष).

        कोपरगाव मतदारसंघात २३ उमेदवारांचे ३२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून बाळकृष्ण दीक्षित यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे- विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष), शिवाजी पोपटराव कवडे (बळीराजा पार्टी), स्नेहलता बिपीनदादा कोल्हे (भारतीय जनता पार्टीं), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), अशोक विजय गायकवाड (अपक्ष), खाटिक अल्लाउद्दीन समशुभाई (अपक्ष), दिलीपराव मारुतीराव तिडके (अपक्ष), शाह अलिम छोटु (अपक्ष), कोल्हे शितल दिगंबर (हिंदुस्थान जनता पार्टी), टेके रावसाहेब चांगदेव (अपक्ष), अहिरे मगन पांडुरंग (अपक्ष), आभाळे नानासाहेब मुरलीधर (अपक्ष), लोंढे शरद लक्ष्मण (अपक्ष), आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), आढाव नारायण माधवराव (अपक्ष), आगवणे ज्ञानदेव देवराम (अपक्ष), आव्हाड प्रभाकर सिताराम (अपक्ष), उकिरडे सुदाम पंढरीनाथ्‍ (अपक्ष), राजेश सखाहरी परजणे (अपक्ष), साळुंके दिपक गणपतराव (अपक्ष), माधव सखाराम ‍त्रिभुवन (बहुजन समाजपार्टी), काळे अशोक नामदेव (अपक्ष) आदींचे अर्ज वैध ठरले.

        श्रीरामपूर मतदारसंघात छाननीनंतर ३२ उमेदवारांचे ४० अर्ज शिल्लक राहिले आहेत. छाननीत ४ अर्ज अवैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे - भाऊसाहेब शंकर पगारे (मनसे), अशोक निवृत्ती बागुल (अपक्ष), अशोक राजाराम जगधने (अपक्ष), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. चेतन सदाशिव लोखंडे (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (अपक्ष), चरण दादा त्रिभुवन (अपक्ष), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना), सुधाकर आनंदा ससाणे (अपक्ष), भागचंद अभिमान नवगिरे (अपक्ष), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम), दिपक चरण चव्हाण (अपक्ष),  प्रणिती दिपक चव्हाण (अपक्ष), कडु शांतवन शेलार (अपक्ष), मिस्टर दादा शेलार (अपक्ष), कानडे लहू नाथा (भारतीय राष्ट्रीय काँगेस), मंदाबाई भाऊसाहेब कांबळे (अपक्ष), अमोलिक गोविंद बाबुराव (बहुजन समाज पार्टी) योगेश रविंद्र जाधव (अपक्ष), भारत संपत तुपे (अपक्ष), अशोकराव रामचंद्र आल्हाट-(जनहित लोकशाही पार्टी), प्रतापसिंग देवराम देवरे (अपक्ष), भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष), डोळस रवी भाऊसाहेब (अपक्ष), सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष), डॉ. श्रीरसागर सुधीर राधाजी (अपक्ष), बागुल युवराज धनाजी (अपक्ष), सुरेंद्र बबन थोरात (अपक्ष), ॲङ स्वप्नील रामचंद्र जाधव (अपक्ष), डोळस भाऊसाहेब कारभारी (अपक्ष), सुभाष यादवराव तोरणे (अपक्ष), खाजेकर विजय गोविंद (अपक्ष). 

        नेवासा मतदारसंघात एकुण 20 उमेदवारांचे अर्ज ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे - बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (भाजपा), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी), सचिन रामदास गव्हाणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), कारभारी विष्णू उदागे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), मतकर शशिकांत भागवत (वंचित बहुजन आघाडी), शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी), अजय अशोकराव कोळेकर (अपक्ष), अशोकराव नामदेव कोळेकर (अपक्ष), गोल्हार रामनाथ गहिनीनाथ (अपक्ष), विठ्ठल विष्णु देशमुख (अपक्ष), भाऊसाहेब शिवराम जगदाळे (अपक्ष), मच्छिंद्र देवराम मुंगशे ( अपक्ष), राजुबाई कल्याण भोसले (अपक्ष), राजेंद्र एकनाथ निंबाळकर (अपक्ष), रामदास मारुती नजन (अपक्ष), लक्ष्मी तुकाराम गडाख (अपक्ष), विशाल वसंतराव गडाख (अपक्ष), सुनीता शंकरराव गडाख (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष),

        शेवगाव मतदारसंघात २० उमेदवारांचे ३० अर्ज प्राप्त झाले होते. आज छाननीनंतर अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे - मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी), ॲङ प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), सुभाष त्रिंबक साबळे (बहुजन समाज पार्टी), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), धीरज मोतीलाल बताडे (राईट टु रिकॉल पार्टी), ज्ञानेश्वर भास्कर जाधव (जय महाभारत पार्टी), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष), विठठल पांडुरंग वाघ (अपक्ष), अमोल अशोक गर्जे (अपक्ष), संदीप गोरक्षनाथ शेलार (अपक्ष), नीलेश बाबासाहेब ढाकणे (अपक्ष), सुनिल मोहनराव पाखरे (अपक्ष), सदाशिव सटवाजी शिंदे (अपक्ष), कमरुद्दिन दगडु शेख (एआयाएमआयएम), बाबासाहेब सुखदेव ढाकणे (अपक्ष).

        राहुरी मतदारसंघात 12 अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे - तनपुरे अरूण बाबुराव (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), ‍कडिर्ले शिवाजी भानुदास (भाजपा), तनपुरे प्राजक्त प्रसादराव (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), तमनर विजय अशोक (वंचित बहुजन आघाडी), कर्डिले राजेंद्र दादासाहेब (अपक्ष), मोकाटे गोविंद खंडु (अपक्ष), संसारे चंद्रकांत प्रभाकर (अपक्ष), तनपुरे रावसाहेब राधुजी (अपक्ष), पवार नामदेव बंडु (अपक्ष), साठे बाबासाहेब भगवान (अपक्ष), लांबे सुर्यभान दत्तात्रय‍ (अपक्ष), कोरडे विनायक रेवणनाथ (अपक्ष).

        पारनेर मतदारसंघात एकुण 9 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे - औटी विजयराव भास्‍करराव (शिवसेना), नीलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), साठे जितेंद्र ममता (बहुजन समाज पार्टी), दगडू रामजी शेंडगे (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद बापू खामकर (जनता पार्टी), सुजीत वसंतराव पाटील (अपक्ष), भाऊसाहेब माधव खेडेकर (अपक्ष), वसंत फुलाजी चेडे (अपक्ष), संदेश तुकाराम कार्ले (अपक्ष).

        अहमदनगर मतदारसंघात १७ उमेदवारांनी २१ नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. आजच्या छाननीत राजू हिरालाल गुजर, सुरेश किसनराव गायकवाड आणि सुभाष पांडुरंग शिंदे  या अपक्षांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे- श्रीराम जनार्दन येंडे (अपक्ष), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष), किरण गुलाबराव काळे (वंचित बहुजन आघाडी), संतोष नामदेव वाकळे (मनसे), अनिल रामकिसन राठोड (शिवसेना), संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष), बहिरुनाथ तुकाराम वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), संजय एकनाथ कांबळे (अपक्ष),  सुनिल सुरेश फुलसौंदर (अपक्ष), सचिन बबनराव राठोड (अपक्ष), , श्रीपाद शंकर छिंदम (बसपा), प्रतीक बारसे (अपक्ष), मिर असीफ सुलतान (एआयएमआयएम).

        श्रीगोंदा मतदारसंघात छाननी प्रक्रियेत ४ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली तर १६ उमेदवारांची २१ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे - पाचपुते बबनराव भिकाजी (भाजप), सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष), सुनिल लक्ष्मण ओहोळ (बहुजन समाज पार्टी), हरिश्चंद्र पाटीलबुवा पाचपुते (अपक्ष), अनुराधा राजेंद्र नागवडे (अपक्ष), घनशाम प्रतापराव शेलार (एनसीपी), टिळक गोपीनाथ घोस (संभाजी ब्रिगेड पार्टी), मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर (वंचित बहुजन आघाडी), प्रविण मोहनराव मांडे (अपक्ष), अण्णासाहेब सिताराम शेलार (अपक्ष), तात्याराम बलभिम घोडके (बहुजन मुक्ती पार्टी), प्रमोद बाजीराव काळे (अपक्ष), राजेंद्र निळकंठ नागवडे (अपक्ष), नंदु श्रावण ससाणे (अपक्ष), जठार बाळु अप्पा (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), दादा श्रीपती शिरवाळे (अपक्ष).

        कर्जत-जामखेड मतदारसंघात एकूण २७ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती. छाननीनंतर त्यातील ४ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली. आता १६ उमेदवारांची २३ नामनिर्देशनपत्रे उरली आहेत. अर्ज माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. वैध ठरलेल्‍या नामनिर्देशन उमेदवारांची नावे-  आप्‍पासाहेब नवनाथ पालवे (महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना), रामदास शंकर शिंदे (भारतीय जनता पार्टी), रोहित राजेंद्र पवार (नॅशनलिस्‍ट कॉंग्रेस पार्टी) शंकर मधुकर भैलुमे (बहुजन समाज पार्टी), अरूण हौसराव जाधव (वंचित बहुजन आघाडी), सोमनाथ भागचंद शिंदे (जनहित लोकशाही पार्टी), अपक्ष उमेदवार अशोक सर्जेराव पावणे, उत्‍तम फकिरा भोसले, किसन नामदेव सदाफुले, गोविंद लक्ष्‍मण आंबेडकर, बजरंग मनोहर सरडे, महारुद्र नरहरी नागरगोजे, राम रंगनाथ शिंदे, शहाजी राजेंद्र काकडे, सुमित कन्‍हैय्या पाटील, ज्ञानदेव नरहरी सुपेकर.

जाहिरात

shadow

संबंधित