कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध!

राजकारण

shadow

कर्जत-जामखेड(APLive24): विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रोहित राजेंद्र पवार (रा. पिंपळवाडी ता. पाटोदा, जि.बीड) यांचा उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापूर्ण अपूर्ण असल्याने बाद ठरवण्यात आला आहे. एकसारख्या नावाचा गैरफायदा उठवत डमी उमेदवार उभा करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यामुळे फसला आहे.

कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार (रा.बारामती) हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासारखेच नाव असलेल्या दुसऱ्या उमेदवाराने अर्ज केला. निवडणुकीत मतदारांची गल्लत करण्यासाठी प्रमुख उमेदवारासारखे नाव असलेल्या व्यक्तींना मुद्दाम उभे करण्याची जुनीच पद्धत आहे. तसाच प्रकार या मतदारसंघात झाला. बीड जिल्ह्यातील रोहित राजेंद्र पवार या उमेदवाराचा अर्ज भरण्यात आला. मात्र, प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याच्या मुद्द्यावर तो फेटाळला गेला. त्यामुळे एकसारख्या नावाचे दोन उमेदवार रिंगणात आणण्याचा प्रयत्न फसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेल्या ोहित पवार  यांचा उमेदवारी अर्ज मात्र मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणामुळे रोहित पवार यांचाच अर्ज बाद झाला, अशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या.

 

दरम्यान, याच मतदारसंघात राम रंगनाथ शिंदे या अपक्ष उमेदवाराचा अर्ज असून, तो मात्र मंजूर झाला आहे. भाजपतर्फे पालकमंत्रीप्रा.राम शिंदे  येथून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या नावाप्रमाणे नाव असलेला हा दुसरा उमेदवार आहे. शिंदे यांचे रेकॉर्डवरील नाव रामदास शंकर शिंदे असे आहे. तत्पूर्वी, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे; मात्र, रविवार सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नगर शहर मतदारसंघातून नेमके कोणकोण उमेदवारी अर्ज मागे घेणार, याची उत्सुकता लागली आहे. सोमवारी दुपारी तीननंतर या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल.

जाहिरात

shadow

संबंधित