पारनेर:विजय औटी यांचा उद्धव ठाकरे तर निलेश लंके यांचा शरद पवार प्रचार नारळ फोडणार

राजकारण

shadow

पारनेर(APLive24): विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली असून शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांच्या प्रचाराचा नारळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी,दि.९ दुपारी ३ वाजता पारनेर येथे फोडला जाणार आहे.अध्यक्षपदी खासदार सुजय विखे असतील.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा नारळ  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी,दि.८ सकाळी ११ वाजता फोडला जाईल.दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ दिग्गज नेत्यांच्या हस्ते करून या निवडणुकीत आणखी रंग भरला जाणार आहे.

दरम्यान,उद्या अर्ज माघारीची मुदत असून अपक्ष अर्ज दाखल केलेले सुजित झावरे,संदेश कार्ले,वसंत चेडे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.झावरे यांनी विखे म्हणतील तसे अशी भूमिका घेतली आहे तर सुजय यांनी मी बाराही मतदारसंघात कमळ व धनुष्यबाणच चालवणार आहे..काही जण गैरसमज करत आहेत..मी औटी यांच्या प्रचाराचा नारळ फोडायला येतोय असा मेसेज सोशल मिडीयावर पाठवला आहे. विखे कुटुंब बोलतात त्याच्या विरुद्ध भूमिका घेतात.त्यामुळे खरी मेख काय हे निवडणूक प्रचारात दिसेलच अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

जाहिरात

shadow

संबंधित