मतदानादिवशी सुट्टी जाहीर

महाराष्ट्र

shadow

पुणे(APLive24):विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने एका अधिसूचनेद्वारे २१ ऑक्टोबर २०१९ या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी

जाहिरात

shadow