महाराष्ट्रात मोदींच्या ९ तर अमित शाहंच्या १८ सभा

राजकारण

shadow

मुंबई(APLive24) : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं दंड थोपटलेत. निवडणुकीच्या प्रचारात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील सामिल होणार आहेत. याकाळात पंतप्रधानांच्या ९ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. तर गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या १८ सभा प्राचार आयोजित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे १७ ऑक्टोबरला मोदींची सातारा आणि पुणे अशा दोन सभा आयोजीत करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

साताऱ्यातील सभेमधून मोदींच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा १७ ऑक्टोबरला होणार आहे. उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तिथे पोटनिवडणूक होत आहे.

या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या प्रचाराला मोदी येणार असल्यामुळे राजे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. त्यातच मोदी राजेंचा प्रचार करणार असल्यानं राजेसमर्थक जोमात दिसणार आहेत.

जाहिरात

shadow

संबंधित