कर्जत:सभासदांचे हित हेच गुरुमाऊलीचे ब्रीद: बापू तांबे

शिक्षण

shadow

कर्जत तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय राऊत, उपाध्यक्षपदी सुभाष लवांडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे
 
कर्जत (प्रतिनिधी ) गुरुमाऊली मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे हित जपण्याचे काम गुरुमाऊली मंडळाने केले असून भविष्यातही हे कार्य पुढे चालू राहील. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये शिक्षक बँकेने नेत्रदीपक अशी प्रगती गुरुमाऊली मंडळाच्या नेतृत्वाखाली केलेली आहे. आत्तापर्यंत झाला त्यापेक्षा आदर्श कारभार उर्वरित दीड वर्षांमध्ये केला जाईल आणि पुन्हा एकदा सभासदांच्या विश्वासाला गुरुमाऊली मंडळ सार्थ ठरेल असे प्रतिपादन जिल्हा शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांनी केले.
कर्जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये  राज्य संघाचे उपाध्यक्ष कैलास राव चिंधे , राजकुमार साळवे, निळकंठ घायतडक, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्युल्लता आढाव, अंजली मुळे, शिक्षक बँकेचे चेअरमन साहेबराव अनाप,संचालक शरद भाऊ सुद्रिक दत्ता कुलट, विठ्ठल फुंदे, विजय नरवडे, बाळासाहेब कापसे, संतोष राऊत, पांडुरंग मोहोळकर, सुयोग पवार, आदी उपस्थित होते. 
बापूसाहेब तांबे पुढे म्हणाले की, शिक्षक संघाला 105 वर्षांची परंपरा असून शिक्षक संघाने राज्यातील शिक्षकांचे जीवन मरणाचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. जिल्ह्यामध्ये काहीजण संघातून बाजूला झालेले असले तरी ते सर्व स्वार्थासाठी बाजूला गेले असून मूळ कार्यकर्ते संघामध्येच आहेत. येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या निवडी घेऊन डिसेंबर अखेर जिल्हा संघ व जिल्हा गुरुमाऊली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल असे त्यांनी सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिक्षण प्रेमी उद्योगपती मेघराज बजाज व दिलीप शिंदे, गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी कर्जत तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय राऊत, उपाध्यक्षपदी सुभाष लवांडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सरचिटणीस आदिकराव बचाटे, कोषाध्यक्ष अशोक कार्ले, कार्या. चिटणीस बजरंग गोडसे उपाध्यक्ष सुभाष लवांडे गुरुमाऊली मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी उद्धव घालमे, कार्याध्यक्ष प्रकाश नेटके, सरचिटणीस अमोल गांगर्डे, कोषाध्यक्ष प्रताप नरवडे, कार्या. चिटणीस योगेश खेडकरउपाध्यक्ष अशोक कदम महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी संजीवनी हराळ, कार्याध्यक्ष सुनिता वाघ, सरचिटणीसपदी उज्वला पंडित व इतर पदाधिकारी निवडण्यात आले. 
दत्तात्रय राऊत यांनी सर्व कार्यकारिणीच्या वतीने बोलताना तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रश्न सोडणूक करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब तापकीर यांनी केले. सूत्रसंचालन किशोर माकुडे व रेवणनाथ नरवडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक बँकेचे संचालक शरद भाऊ सुद्रिक, पांडुरंग खराडे, तापकीर बाळासाहेब, संदीप ठाणगे, दत्तात्रय राऊत, किशोर माकुडे नारायण पिसे, अशोक कार्ले, बजरंग गोडसे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

shadow

संबंधित